२७ ग्राम एम.डी. मेफेड्रान बाळगणाऱ्या दोघांना अटक; गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक २ ची कारवाई

पुणे : पुण्यात २७ ग्राम एम.डी. मेफेड्रान बाळगणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. १२,४१,००० किंमतीचे २७ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ व इतर ऐवज जप्त करण्यात आला. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक २ चे प्रभारी पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
मोतीसिंह श्रवणसिंह राजपुरोहित (वय २८ वर्षे, रा. प्लॅट नं ६ धोका बिल्डींग, लोहगांव रोड वाघोली, मुळ गाव राधाकृष्ण मंदिराजवळ बासणी तहसिल शेरगड जि. जोधपुर राजस्थान) हरीष सुजनाराम देवासी (वय २२ वर्षे, रा. लेन नं २, बायफ रोड, वाघोली पुणे मुळ गांव गुडामालाणी जि. बाडमेर राजस्थान ) अशी त्यांची नावे आहेत.
अंमली पदार्थ विरोधी पथक २ खराडी पोलीस स्टेशन हद्दीत गस्त करीत असताना पहाटे साडेपाचच्या सुमारास खराडी ईओन आयटी पार्क फेज २ मागील गेट जवळ आरोपी संशयास्पद अवस्थेत आढळून आले. आरोपी विरुध्द खराडी पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. ऍक्ट कलम ८ (क), २१ (ब), २९ प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पकंज देशमुख, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-३ शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
अंमली पदार्थ विरोधी पथक पुणे शहरचे प्रभारी पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उप-निरीक्षक अस्मिता लाड, पोलीस अंमलदार संदिप जाधव, पृथ्वीराज पांडुळे, सुनिल महाडीक, गणेश गोसावी, संदिप देवकाते, देविदास वांढरे, दिनेश बास्टेवाड, शुगांगी म्हाळसेकर व खराडी पोलीस स्टेशन कडील कॉप्स २४ मार्शलचे पोलीस अंमलदार पगारे, जाधव यांच्या पथकाने सहभाग घेतला.



