गुन्हेगारीपुणे शहरमहाराष्ट्र

अमरावतीवरून पुण्यात काम शोधण्यासाठी आलेल्या ९ जणांना डंपरने चिरडलं

त्यात ३ चिमुरड्यांचा जागीच मृत्यू तर ६ जण जखमी असून पोलिसांनी चालकाला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत.

पुणे प्रतिनिधी : अमरावतीवरून पुण्यात काम शोधण्यासाठी आले, डोक्यावर छत नाही, खिशात पैसे नाहीत, त्यामुळे रात्र फुटपाथवर काढण्याचा विचार केला. पण भरधाव वेगाने आलेल्या डंपरने ९ जणांना चिरडले. त्यात तीन चिमुरड्यांना जागीच मृत्यू झाला आहे तर सहाजण जखमी झाले आहे. पोलिसांनी तात्काळ चालकाला बेड्या ठोकल्यात. त्याची चौकशी सुरू आहे.

गजानन तोटे असं डंपर चालकाचे नाव आहे. चालक भरधाव वेगात डंपर चालवत होता. तीव्र उतार असल्याने त्याच्या गाडीवरचे नियंत्रण सुटले अन् वाहन थेट फुटपाथवर गेल्याची माहिती समोर आली आहे. जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहे. डंपर चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अमरावतीहून एकूण १२ जण पुण्यात कामासाठी आले होते. त्यातील ९ जणांना डंपर चालकाने चिरडले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी डंपर चालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.

👉🏻अपघातामध्ये मृत्युमुखी व्यक्तींची नावे १. विशाल विनोद पवार वय २२ वर्ष, रा. अमरावती मूळ जिल्हा, २. वैभवी रितेश पवार वय १ वर्ष, ३. वैभव रितेश पवार वय २ वर्ष

👉🏻अपघातामध्ये  जखमी झालेल्या व्यक्तींची नावे: १. जानकी दिनेश पवार, २१ वर्षे,२. रिनिशा विनोद पवार, १८ वर्षे, ३. रोशन शशादू भोसले, ९ वर्षे, ४. नगेश निवृत्ती पवार, वय २७ वर्षे, ५. दर्शन संजय वैराळ, वय १८,  ६. आलिशा विनोद पवार, वय ४७ वर्षे तसेच या घटनेत ३ निष्पाप चिमुकल्यांना मृत्यू झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page