गुन्हेगारीनवी दिल्लीमहाराष्ट्रराष्ट्रीय

पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी; महिला ताब्यात

नवी दिल्ली : मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात काल रात्री एक फोन आला. हा फोन आल्यानंतर पोलिस नियंत्रण कक्षात एकच खळबळ उडाली. कारण फोन करणा-या व्यक्तीने थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले. त्या कॉलरने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याचा कट रचल्याची धमकी दिली. बुधवारी रात्री ९ च्या सुमारास नियंत्रण कक्षाला धमकीचा हा फोन आला. मोदींना मारण्याचा कट सुरू असून वेपनची तयारी झाल्याची माहिती फोन करणा-या व्यक्तीने दिली. या घटनेची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. मुंबई पोलिसांनी तातडीने फोन करणा-या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. यामध्ये कॉल करणारी व्यक्ती एक महिला असल्याचा दावा करण्यात येतोय. या कॉल प्रकरणी शीतल चव्हाण नावाच्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी मुंबईच्या आंबोली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात महिला मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे कळते. स्टँडर्ड प्रोसिजरनुसार पोलिसांकडून तपास सुरू आहे. या महिलेचे वय ३४ वर्षे असल्याचे समजते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page