राष्ट्रीय

भारतीय हवाई दलाचे मिग-21 विमान राजस्थानात कोसळले; दोन महिलांचा मृत्यू

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये भारतीय हवाई दलाचे मिग-21 हे लढाऊ विमान क्रॅश झाले. यामध्ये दोन महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हनुमानगडच्या बहलोल गावात मिग-21 हे लढाऊ विमान कोसळले. या अपघातात टेरेसवर झोपलेल्या महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. हेलिकॉप्टर क्रॅश होण्यापूर्वी पायलट आणि को-पायलट बाहेर पडले. दरम्यान, हवाई दलाकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. त्यानंतर पायलटने प्रसंगावधान दाखवत हे विमान शेतात उतरवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शेतातच बांधलेल्या घरावर हे विमान कोसळले. दोन्ही वैमानिक वेळीच पॅराशूटच्या मदतीने उतरण्यात यशस्वी झाले. त्यामुळे जीवितहानी टाळता आली. मात्र, टेरेसवर झोपलेल्या दोघांचा यामध्ये मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर राजस्थानचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. भारतीय हवाई दलाचे मिग-21 लढाऊ विमान राजस्थानमधील हनुमानगढजवळ कोसळले. या विमानाने सुरतगड येथून उड्डाण केले होते. पण नंतर ही दुर्घटना घडली. यामध्ये पायलट सुरक्षित आहे तर दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page