गुन्हेगारीमहाराष्ट्र

लष्करात भरतीचे आमिष दाखवून तरुणांना फसवणारा गजाआड 

गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक व मिलिटरी इंटेलिजन्स सदर्न कमांड लायझन यूनिट यांची संयुक्त कारवाई

लष्करात भरतीचे आमिष दाखवून तरुणांना फसवणारा गजाआड

पुणे : लष्करी गणवेश घालून मोठ्या अधिकाऱ्यांच्या ओळखी असल्याचे सांगून तरुणांना लष्करात भरती करतो, असे सांगून आर्थिक फसवणूक शोषण करुन महिलेचे १६ लाख रुपये लुबाडणाऱ्यास बेड्या ठोकण्यात आल्या. प्रमोद भिमराव यादव (वय २७ अमृतवाडी, ता. जत, जि. सांगली) असे आरोपीचे नाव आहे.

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने व मिलिटरी इंटेलिजन्स सदर्न कमांड लायझन यूनिट यांच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली.

अधिकारी असल्याचे भासवून एका महिलचे शोषण करुन तिच्याकडून १६ लाख रुपये लुबाडून फसवणूक केल्या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

आरोपीने ८ ते ९ तरुणांना सैन्यात भरती करतो असे सांगून आर्थिक फसवणूक केली असल्याची माहिती आर्मी इंटेलिजन्स युनिटला मिळाली.

तक्रारदार राहुल अशोक बच्छाव (वय- २६ रा. नांदगाव) व इतर आठ जणांकडे चौकशी करण्यात आली. चौकशीत आरोपीने आर्मी युनिफॉर्म परिधान करुन बनावट ओळखपत्र दाखवले. तसेच स्वत: सैन्य दलातील अधिकारी असल्याचे भासवून फिर्यादी व इतरांना आर्मीत भरती करतो असे आश्वासन देऊन झालेबाबतची बनावट भरती लिस्ट पाठवून २८ लाख ४० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचे समोर आले.

आरोपीचा शोध घेण्यासाठी खंडणी विरोधी पथक व इंटेलिजन्स यांचे एक पथक तयार करण्यात आले. सांगोला येथे जाऊन आरोपीस पकडण्यात आले. याप्रकरणी कोंढावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीने आतापर्यंत चार लग्न केल्याची माहिती मिळत आहे. आरोपी माजी सैनिकाचा मुलगा आहे. त्यालाही सैन्य दलात भरती व्हायचे होते. मात्र, लष्करात भरती होऊ न शकल्याने घरातल्या सदस्यांना अंधारात ठेवून फसवणूक केली. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. खंडणी विरोधी पथक-२ चे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे,पोलीस उप निरीक्षक श्रीकांत चव्हाण व पोलीस अंमलदार, विजय गुरव, विनोद साळुंके, संग्राम शिनगारे, ईश्वर आंधळे, अमोल पिलाने, चेतन शिरोळकर यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page