गुन्हेगारीपुणे शहरसामाजिक

या वसुलीवाल्याचे ‘पितळ’ कधी उघड होणार?

पुणे (विशेष प्रतिनिधी) : भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बेकायदेशीर धंद्यांना उत आला असून या धंद्यांना पोलीस ठाण्यातील वसुलीवाल्याचे पाठबळ असल्याने धंदे बिनधास्त सुरू असल्याचे बोलले जात आहे. नागरिक मात्र या धंद्यांमध्ये भरडल्या जाणाऱ्या युवक आणि महिलांमुळे हैराण झाले आहेत.

कात्रज भाजी मंडई जवळ खुलेआम लॉटरी सेंटरच्या नावाखाली मटका जुगाराचे दुकाने सुरू आहे. कात्रज घाटात पत्त्याचा क्लब सुरू आहे. रात्री अपरात्री हा क्लब सुरू असतो. तर सिंहगड कॅम्पस व कात्रज घाट या भागात बेकायदेशीर हुक्का सुरू असल्याची माहिती आहे. या हुक्का पार्लर मध्ये तरुण मुलगा मुलींची वर्दळ वाढली आहे.

किनारा, मल्हार, सृष्टी, श्रेयश नावाच्या हाॅटेल्स मध्ये लॉजिंगच्या नावाखाली वेश्याव्यवसाय बोकाळला आहे. दिवसभर आणि रात्री वेश्या आणि त्यांचे ग्राहक येत जात असतात. त्यामुळे त्या परिसरातून ते जा करणाऱ्या सामान्य महिला वर्गाला त्रास सहन करावा लागत आहे.

संपूर्ण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या वेगवेगळ्या बेकायदेशीर धंद्यांमधून पैसे वसूल करणाऱ्या वसुलीवाल्याचे पाठबळ असल्याने बेकायदेशीर धंदे करणारे जोमात आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अंधारात ठेवले जाते. या वसुलीवाल्याचे ‘पितळ’ कधी उघड होते याकडे प्रामाणिक पोलीस कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

काही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बेकायदेशीर धंद्यांमध्ये वसुली करणाऱ्या पोलिसांची भागीदारी असल्याचे मध्यंतरी उघडकीस आले होते. तेच लोण कात्रज परिसरापर्यंत आल्याने बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांना मोकळे रान मिळाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page