भाडयाने गाडी घेवून पसार झालेल्या आरोपीला पालघर पोलिसांच्या मदतीने अटक
विमाननगर पोलीस स्टेशनची कामगिरी

पुणे : झुमकार कंपनी मार्फत महिंद्रा थार गाडी भाडयाने घेवून गाडीसह पसार झालेल्या चोरट्याला विमाननगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी पालघर पोलिसांच्या मदतीने गाडीसह अटक केली. शैलेशकुमार हिंगु (रा. ४०६ नंदनवन सोसायटी, मातृशक्ती सोसायटी जवळ, पुणगाव, सुरत गुजरात) असे त्याचे नाव आहे.
तलासरी, पालघर येथे महाराष्ट्रामधून गुजरात मध्ये जात असताना पालघर पोलिसांच्या मदतीने सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. टुरिस्ट व्यावसायिक वैजनाथ कारभारी खरमाटे यांनी १३ जून रोजी १८,००,००० किंमतीची गाडी झुमकार कंपनीच्या माध्यमातून शैलेशकुमार हिंगु यास भाड्याने दिली होती. गाडी घेवून आरोपी फरारी झाला होता. विमानतळ पोलीस स्टेशन येथे भा.दं.वि. ४०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चंदन पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी आरोपीच्या मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण करून त्याचे लोकेशन शोधून काढले. गाडी ताब्यात घेण्यात आलेली आहे. शैलेशकुमार हिंगु याच्यावर मुंबई गावदेवी पोलीस स्टेशन व नवसारी पोलीस स्टेशन, गुजरात येथे दारुबंदी अधिनियम कलम ६५ (ड) प्रमाणे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेशकुमार, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग रंजन शर्मा पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग संजय पाटील यांच्या आदेशान्वये करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संगीता माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक रविंद्र ढावरे, अंमलदार अविनाश शेवाळे, अंकुश जोगदंडे, दादासाहेब बर्डे, गिरीश नाणेकर, रुपेश पिसाळ, नाना कर्वे, सचिन जाधव, सचिन कदम, योगेश थोपटे, ज्ञानेश्वर आवारी या पथकाने सहभाग घेतला.



