गुन्हेगारीमहाराष्ट्रलातूरसामाजिक

लातूरात दहशत माजविणाऱ्या मनोरुग्णाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश

लातूर : लातूर इथल्या बोरफळ गावात गेल्या तीन दिवसांपासून मनोरुग्णाची दहशत पाहायला मिळत होती. अखेर रविवारी या मनोरुग्णाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय. मनोरुग्णाला पकडताना दोन तरुणांनी आपल्या जीवाची बाजी लावून त्याला अटक केलीये. औसा तालुक्यातील बोरफळ गावातील मनोरुग्ण नेताजी विश्वनाथ मांजरे (वय ३५) याने शनिवारी (दि.२२) राष्ट्रीय महामार्गावर बोरफळ जवळ धाराशिव जिल्ह्यातील एका व्यक्तीवर या प्राणघातक हल्ला केला होता. या घटनेनंतर सदरील जखमी व्यक्तीच्या तक्रारीवरून औसा पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रेजितवाड आपल्या कर्मचाऱ्यांसह रविवारी सायंकाळी ६ वाजता बोरफळ येथे पोहचले. यावेळी त्यांना गुंगारा देत मनोरुग्णांनी राष्ट्रीय महामार्ग गाठला. याठिकाणी जमलेल्या तरुणांनी सदरील मनोरुग्णाला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपल्या दोन्ही हातामधील धारदार विळ्याने तरुणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये एक तरुण बालबाल बचावला गेला. सदरील मनोरुग्णांनी राष्ट्रीय महामार्गावर धिंगाणा घालण्यास सुरुवात केल्यावर जमलेल्या काही धाडसी तरुणांनी जीवाची पर्वा न करता या मनोरुग्णाला पकड ले व त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. औसा – तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल तीन तास सदरील थरार अनेकांचे ठोके चुकवणारा होता. मनोरुग्ण मोबाईल बोलत असलेल्या लोकांवर हल्ला करीत असल्याची माहिती समोर आली . त्या ला जेरबंद केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या मनोरुग्णाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page