गुन्हेगारीपुणे शहर

४ दुचाकी वाहने चोरणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेकडून जेलची हवा

गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाची कामगिरी

पुणे : लोणीकाळभोर, मार्केटयार्ड, हडपसर परिसरातून ४ दुचाकी वाहने चोरणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने हडपसर भागात पकडून अटक केली.

अक्षय सुरेश मगर (वय २३, साई सत्यम पार्क, कावडे वस्ती, वाघोली) प्रविण आत्माराम बुरकुल (वय १९, भाडाळे वस्ती वाघोली) आणि शुभम मोहन चव्हाण (वय २३,शिंदे वस्ती लोणीकंद) अशी आरोपींची नावे आहेत.

पोलीस अंमलदार राहुल इंगळे, संदीप येळे, विक्रांत सासवडकर यांना माहिती मिळाली की लक्ष्मी इन्क्लेव्ह सोसायटीचे गेट जवळ, जुन्या कॅनॉल शेजारील रोडवर, माळवाडी, हडपसर येथे एका बिगर नंबर प्लेट दुचाकीवर तीन जण कोणाची तरी वाट पाहत बसलेले आहेत. गाडी चोरीची आहे.

स्टाफच्या मदतीने सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. ताब्यात असलेली यमाहा rx100 गाडी हडपसर येथून चोरी केल्याचे सांगितल्याने गाडी पंचनाम्याने जप्त करण्यात आली.

लोणीकाळभोर पोलीस स्टेशन, मार्केटयार्ड पोलीस स्टेशन व हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतून यामाहा गाडी त्यांनी चोरून नेली होती. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होत आहे.

अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी, पोलीस अंमलदार उदय काळभोर, अशोक आटोळे, दिनकर लोखंडे, गणेश लोखंडे, शिवा जाधव, दत्तात्रेय खरपुडे, सुदेश सपकाळ, राहुल इंगळे, विक्रांत सासवडकर, संदीप येळे, अमोल सरतापे, विनायक येवले यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page