क्रीडानाशिकपुणे शहरमहाराष्ट्रराष्ट्रीयशैक्षणिक

‘वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स’ मध्ये पोलीस अधिकारी विजय चौधरी यांची विजेतेपदावर मोहोर

पुणे : ‘महाराष्ट्र केसरी’ हा किताब तीन वेळा जिंकणारे आणि अप्पर पोलिस अधीक्षक विजय नथ्थू चौधरी यांनी शनिवारी विणीपेग(कॅनडा) येथे झालेल्या वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्समध्ये कुस्ती या खेळामध्ये विजेतेपदावर मोहोर उमटवली. सुवर्ण पदक पटकावत विश्व विजेतेपदावर भारताचे नाव नोंदवले. वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स हे जागतिक स्तरावर पोलीस दलासाठी ऑलिम्पिक मानले जाते. चौधरी पुणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चौधरी यांनी उपांत्य फेरीत त्यांच्या सर्वात कठीण प्रतिस्पर्ध्याचा सामना केला. त्यांचा सामना गतविजेत्या जेसी साहोटाशी झाला. अटीतटीच्या सामन्यात चौधरी यांनी साहोताचा ११-८ अशा फरकाने पराभव केला.अंतिम सामन्यात, विजय चौधरी यांनी अमेरिकेच्या जे. हेलिंगरवर १० गुणांची मोठी आघाडी घेत अंतिम सामना ११-१ असा जिंकून भारताला १२५ किलो गटात सुवर्ण पदक मिळवून दिले.

जळगावच्या चाळीसगाव जिल्ह्यातील सायगाव बगळी या गावचे असलेले चौधरी हे महाराष्ट्रातील शिवाय तीन वेळा महाराष्ट्र केसरी चॅम्पियन असून अनेक मानाच्या कुस्त्यांचे विजेतेपद आणि तसेच राष्ट्रीय सुवर्णपदकावर देखील विजय चौधरी यांनी नाव कोरले आहे.

चौधरी यांना काही महिन्यांपासून त्यांचे प्रशिक्षक हिंदकेसरी रोहित पटेल यांनी बायो बबलमध्ये ठेवले होते आणि पुण्यातील कात्रज येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात अनेक महिने कॅनडाच्या टाइम झोननुसार प्रशिक्षण घेत होते.

विजयाबद्दल चौधरी म्हणाले, “काही महिन्यांपूर्वी मी महाराष्ट्र राज्य पोलीस दलासाठी सुवर्णपदक जिंकले होते. त्या दिवशीच मी जागतिक पोलीस खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा निश्चय केला होता. आज माझ्या मेहनतीचे चीज झाले असून मी जागतिक स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदक जिंकून भारतीय कुस्ती क्षेत्रासाठी भरीव कामगिरी केल्याचा मला आनंद आहे. सुवर्णपदक मी संपूर्ण भारतीय पोलीस दलाला समर्पित करतो.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page