गुन्हेगारीपुणे शहर

भारतीय व परकीय चलन घरफोडी करुन चोरुन नेणाऱ्यास अटक

चंदन नगर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी

पुणे : खराडीत सिनॅप्स लेन्स प्रा. लिमीटेड कंपनी मध्ये ठेवलेले भारतीय व परकीय चलनाचे असे मिळून ३ लाख ७ हजार रुपये घरफोडी करुन चोरुन नेणाऱ्यास चंदननगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली.

फुरकान नईम खान ( वय २१, रा. शिया पोस्ट फ्लोरा, गरक फॅक्टरी, रुम नं. ४५, ता. अलीशा, सेक्टर २९, जिल्हा पानिपत, राज्य हरियाणा) असे त्याचे नाव आहे. सॅमसंग स्टोअर, मोर मॉलजवळ, खराडी पुणे येथे देखील रात्रीची घरफोडी चोरी केली असल्याची कबुली दिली आहे.

७ तारखेला ही घटना झाली. पवन तानाजी चव्हाण (वय ३०, धंदा नोकरी, रा. माउली सदम, प्लॅट नं. १२५ /१, झेड कॉर्नर मांजरी रोड, बु. ता. हवेली) यांनी याबाबत फिर्याद केली होती. भादंविक ४५४,४५७,२८० प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार विकास कदम, सुभाष आव्हाड यांनी तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास केला. त्यावेळी खान निष्पन्न झाला, त्याचा शोध घेत असताना १२ तारखेला पिंपरी चिंचवड येथे मिळून त्याला पोलीस खाक्या दाखवून पकडण्यात आले.

तपास केला असता, त्याने दाखल चोरी बरोबरच आणखी एक गुन्हा केल्याचे दिसून आले. चोरी केलेल्या भारतीय व परकीय चलनातील रक्कमेपैकी काही रक्कम त्याचे ताब्यातून जप्त करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, उप आयुक्त परिमंडळ ४ शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनिषा पाटील, उपनिरीक्षक अरविंद कुमरे, दिलीप पालवे, पोलीस अंमलदार सचिन कुटे, अविनाश संकपाळ, सचिन रणदिवे, सुहास निगडे, महेश नाणेकर, शिवा चांडे, श्रीकांत शेंडे, नामदेव गडदरे, सुभाष आकार, विकास कदम, शेखर शिंदे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, गणेश हांडगर यांनी केली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page