महाराष्ट्रमुंबईशैक्षणिकसातारा

सातारा जिल्हा पोलीस दलामार्फत राबविण्यात येणाऱ्या उंच भारारी उपक्रमाअंतर्गत ५९५ युवक व युवतींना प्रशिक्षण

सातारा : सातारा जिल्हयातील सुशिक्षीत व बेरोजगार युवकांना योग्य मार्गदर्शन व संधी उपलब्ध करुन त्यांच्या कल्याणासाठी तसेच विकासासाठी समुपदेशन, मानसोपचार, शिक्षण, कौशल्य विकास, खेळ, रोजगार अशा तरतुदी करणेसाठी उंच भरारी योजना सातारा जिल्हा पोलीस दलामार्फत राबविण्यात येत आहे. आजअखेर उंच भरारी उपक्रमाअंतर्गत एकुण ५९५ युवक व युवतींना प्रशिक्षण व रोजगार प्राप्त झालेला आहे.

त्यामध्ये सातारा जिल्हयातील १८ ते ३० या वयोगटातील युवक, युक्ती व त्यांचे पालक यांचेशी संवाद साधुन त्यांना त्यांच्या आवडीनुसार नोकरी किंवा रोजगार उपलब्ध करुन देणे, तसेच त्यांना स्वतःच्या व्यवसायाकरीता कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन कोल्हापूर व उदय गुजर फाऊंडेशन विंग, ता. शिरवळ यांचे माध्यमातून ४५ व ३० दिवसांच्या प्रशिक्षणाकरीता सातारा जिल्ह्यातून. दुचाकी मॅकेनिक,वेल्डर, असिस्टंट इलेक्ट्रीशियन या कोर्सचे प्रशिक्षणाकरीता एकुण ५५ युवक व युवतींना कोल्हापुर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी मार्गदर्शन केले. त्यावे. पोलीस अधीक्षक. समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक आंचल दलालय यांनी उंच भरारी योजनेचा उद्देशविशेष पोलीस महानिरीक्षक व प्रसार याबाबत फुलारी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवुन सर्व युवकांना वाहनातून कोल्हापूर व शिरवळ येथे प्रशिक्षणाकरीता रवाना केले.

सातारा जिल्हा पोलीस व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन प्रशिक्षण संस्था सातारा यांचे संयुक्त विद्यमानाने १. दुचाकी रिपेअरिंग/ मॅकेनीकल, २. चारचाकी रिपेअरिंग/मॅकेनीकल ३. हॉटेल मॅनेजमेंट, ४. असिस्टंट इलेक्ट्रीशियन, ५. प्लंबिंग व ६. वेल्डींग या कोर्सच्या प्रशिक्षणाकरीता कोल्हापूर, भोर, अहमदनगर व छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पाठविण्यात आले आहे.

आजअखेर उंच भरारी उपक्रमाअंतर्गत एकुण ५९५ युवक व युवतींना प्रशिक्षण व रोजगार प्राप्त झालेला आहे. तसेच या योजनेत समाविष्ट झालेल्या इतर युवकांना त्यांच्या आवडीनुसार नोकरी किंवा रोजगार तसेच त्यांना स्वतःच्या व्यवसायाकरीता कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page