गुन्हेगारीपुणे शहर
भीषण दुर्घटनेनंतर शांतता प्रस्थापित करण्यात हडपसर पोलिसांना यश

पुणे : हडपसर परिसरातील मंतरवाडी चौक ते हांडेवाडी रोड याठिकाणी एका डंपर गाडीचा एक्टिवा या दुचाकी वाहनाला धक्का बसून गाडीवर आईसोबत असणारा – शौर्य सागर आव्हाळे ( वय ७,वर्ष, रा – वाघोली, ता. हवेली) हा पडल्यामुळे डंपरच्या चाकाखाली आला व त्यामध्ये तो मरण पावला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मुलाच्या संतप्त नातेवाईकांनी डंपरला आग लावली. आगीत डंपर जागीच जळून खाक झाला. ही माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके तात्काळ स्टाफसह दाखल झाले. फायर ब्रिगेडला बोलावून आग विझवण्यात आली. डंपर ड्रायव्हर यास ताब्यात घेण्यात आले. या दुर्घटनेमुळे वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यात आली.



