पुणे शहरमहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिक

आता मुलांच्या नावापुढे वडिलांआधी आईचे नाव लागणार; अजित पवार यांची माहिती

बारामती : इथून पुढे मुलगा असो की, मुलगी आधी आईचे नाव, नंतर वडिलांच नाव येणार आहे, असा महत्वाचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करताना अजित पवार म्हणाले. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी चौथ्या महिला धोरणाची माहिती अजित पवारांनी मेळाव्यात दिली.

अजित पवार म्हणाले, “यापुढे अजित अनंतराव पवार असे नाव दिले जायचे मुल जन्माला आल्यानंतर मुलाचे नाव, वडिलांच नाव आणि आडनाव असे असायचे. पण आता नवीन निर्णय घेतला आहे.

इथून पुढे मुलाचे किंवा मुलीचे नाव, मग आईचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लावले जाईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

शेवटी महिला देखील समाजातील महत्वाचा घटक आहे, असे अजीत पवार म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page