पुणे शहर

जिल्हा परिषदेत शिवसेना गटनेतेपदी सुवर्णा दरेकर

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या शिवसेना शिंदे गट पक्षाच्या गटनेतेपदी पदाची धुरा महिलेकडे दिली असून आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव पेठ गटामधून निवडून आलेल्या सुवर्णा देविदास दरेकर यांची गटनेता निवड करण्यात आली.

शिवसेनेचे जिल्हा परिषदेमध्ये पाच सदस्य असून त्यांच्या गटाची नोंदणी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

गटनेता म्हणून सुवर्णा दरेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर, देविदास दरेकर, रमेश कोंडे त्याचबरोबर सदस्य मंगेश काकडे, रूपाली कोंडे, स्मिता कणसे, नेहा पाटील, सुवर्ण दरेकर हे शिवसेनेचे पाचही जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.

सुवर्णा दरेकर म्हणाल्या, जिल्हा परिषदेतील योजना आणि कामे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माझे प्राधान्य राहील. सभागृहातील आणि प्रशासकीय कामकाजामध्ये गतिमानता यावी, योजना राबवताना कुठेही अनुशेष अथवा विशिष्ट विभागावर अन्याय होणार नाही. यावर देखील आम्ही लक्ष ठेवून न्याय देण्याचा प्रयत्न करू.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page