राउंडसह पिस्टल विक्रीसाठी आलेला विद्यार्थी अटकेत
पुणे : ४० हजार रुपये किंमतीचे पिस्टल एक जिवंत राउंडसह विक्रीसाठी बाळगल्याने आर्यन बापू बेलदरे (वय १९ वर्षे, काम शिक्षण, रा. आई श्री व्हीला अर्पाटमेंन्ट, फलॅट नंबर ३०४, तिसरा मजला, स्मशानभूमी समोर, आंबेगाव बुद्रुक) यास आंबेगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली. तो विद्यार्थी दशेतील आहे.
पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे व निलेश जमदाडे यांना माहिती मिळाली की, आई श्री व्हीला अपार्टमेंटचे बाजूला गाईच्या गोठ्यामध्ये एक जण संशयास्पद आहे. त्याने काळ्या रंगाचा गोल गळयाचा हाफ टी शर्ट व काळी पॅन्ट घातली आहे. तो अंगाने मजबूत असून त्याच्याकडे पिस्टल आहे.
सदर ठिकाणी सापळा रचण्यात आला. काही वेळातच आरोपी आला असता त्यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं. १०५७/२०२४ भारतीय हत्याराचा अधिनियम कलम ३ सह २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कामगिरी अमितेश कुमार ( पोलीस आयुक्त) रंजनकुमार शर्मा (पोलीस सह आयुक्त) प्रविणकुमार पाटील (अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग पुणे शहर) स्मार्तना पाटील (पोलीस उपआयुक्त सो, परिमंडळ-२) राहुल आवारे (सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
आंबेगाव पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका गोरे, पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, हनमंत मासाळ, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, प्रमोद भोसले, योगेश जगदाळे, विनायक पाडळे यांनी सहभाग घेतला.



