मुंबईसामाजिक

दादरच्या इंदु मिल मध्ये उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा ३५० फूट उंचीचा पुतळा

मुंबई: दादरच्या ‘इंदु मिल’ मध्ये साकारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम वेगाने सुरू असून २०२८ मध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल. ३५० फूट उंचीचा पुतळा असलेले हे जगातील अनोखे स्मारक आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील पुतळ्याच्या डाव्या हातात संविधान असून आणि उजवा हात वर उंचावलेला आहे. हात ३२ मीटर लांब असून तर्जनीचा व्यास ६ फूट आहे.

पुतळ्याच्या सांगाड्याचे
काम दमण, भिलाई, आणि नवी मुंबईत सुरू आहे. हा सांगाडा ६ हजार मे. टन असून ४२७८ मे. टनाचे काम प्रकल्पस्थळी, दादरला आले आहे. पुतळ्याच्या कांस्य धातूचे आवरण ८५० मेट्रीक टनाचे असून १०० मेट्रीक टन आवरण दादरमध्ये आले आहे. यामध्ये पुतळ्याच्या दोन बुटांचा समावेश आहे.

१०० फूट पादपीठाच्या (पेडस्टल) आरसीसीचे काम सुरू आहे. त्यावर पुतळ्याचा सांगाडा उभा केला जाईल. या सांगाड्यावर कांस्य धातूचे पुतळ्याचे आवरण (स्कीन) असणार आहे.

सध्याच्या युध्दाच्या पार्श्वभूमीवर काही अडचणी उद्भवल्या असून तांबे आणि द्रवीकृत पेट्रोलियम वायू (एलपीजी) यांची टंचाई निर्माण झाली असून त्यांचे दरही वाढले आहेत. त्यामुळे स्मारकाचे बांधकाम करणाऱ्या ‘शापूरजी पालनजी’ कंपनीस नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page