मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विवेक लागू यांचं वयाच्या ७४ व्या वर्षी निधन

मुंबई : मराठी मनोरंजनसृ्ष्टीतून दु:खद बातमी आली आहे. ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे गुरूवार दि. १९ जून रोजी निधन झाले. लेखक, संगीत दिग्दर्शक अशीही त्यांची ओळख होती. अनेक वर्षांपासून ते इंडस्ट्रीत काम करत होते. त्यांच्या पश्चात एक मुलगी आहे. आज २० जून रोजी सकाळी दहा वाजता ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

विवेक लागू यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांना लेखन आणि दिग्दर्शनाची आवड होती. हीच आवड त्यांना मुंबईत घेऊन आली. त्यांनी रंगभूमीवरुन करिअरला सुरुवात केली. सुरुवातीला ते लेखन, दिग्दर्शन करायचे. काही नाटकांसाठी त्यांना पुरस्कारही मिळाला. शिवाय संगीतातही त्यांची रुची होती. मात्र अपघातानेच ते अभिनयाकडे वळले.

विजय मेहता यांच्या शिबिरात येण्याची त्यांना संधी मिळाली होती. मात्र त्या शिबिरात केवळ अभिनयाचेच धडे देणार होत्या. मुंबईत १ महिना फुकट राहता येणार होते म्हणून त्यांनी शिबीर जॉइन केलं आणि अभिनय शिकले. दिग्दर्शनाची आवड असूनही त्यांनी अभिनयही चांगला केला. इतकेच नाही तर अभिनयातही त्यांनी पुरस्कार मिळवले.

रीमा आणि विवेक लागू यांची पहिली भेट १९७६ मध्ये

रीमा आणि विवेक लागू यांची पहिली भेट १९७६ मध्ये एका बँकेत काम करताना झाली होती. तिथूनच त्यांच्या नात्याची सुरुवात झाली. दोन वर्षांच्या ओळखीनंतर त्यांनी १९७८ मध्ये लग्न केलं. मात्र पुढे काही वर्षांनी त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. विवेक लागू आणि रीमा लागू यांना मृण्मयी लागू वैकुल ही एक मुलगी आहे. तिने आपल्या आई-वडिलांच्या कलेच्या परंपरेला पुढे नेलं आहे. लेखिका आणि दिग्दर्शिका म्हणून मृण्मयीने ‘थप्पड’ आणि ‘स्कूप’सारख्या प्रोजेक्ट्सवर काम केलं असून ती सध्या आधुनिक भारतीय सिनेसृष्टीतील एक महत्त्वाचा आवाज बनली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page