मनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रीय

मराठी फिल्मफेअर पुरस्कार जाहीर, ‘पाणी’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत मानाचा समजला जाणारा ‘फिल्मफेअर मराठी’ पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात मराठी सिनेमा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणा-यांचा सन्मान करण्यात आला.

‘फुलवंती’ हा चित्रपट सात प्रमुख पुरस्कारांसह या सोहळ्यातील सर्वात यशस्वी चित्रपट ठरला. त्याच्या पाठोपाठ ‘पाणी’ या चित्रपटाने सहा पुरस्कार पटकावले.

महेश मांजरेकर यांना ‘जुनं फर्निचर’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष) साठी पुरस्कार मिळाला. तर प्राजक्ता माळी ( फुलवंती) आणि वैदेही परशुरामी (एक दोन तीन चार) यांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (महिला) साठी पुरस्कार देण्यात आला. आदिनाथ कोठारेला ‘पाणी’साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्काराने गौरवण्यात आलं. तर जितेंद्र जोशीला ‘घात’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स चॉईस) पुरस्कार मिळाला. राजश्री देशपांडेला ‘सत्यशोधक’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स चॉईस) म्हणून निवडण्यात आलं.

मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज मंडळींसह बॉलिवूडमधीलही कलाकार या सोहळ्यासाठी उपस्थित होते. राजकुमार राव, तब्बू, नवाजुद्दीन सिद्दीकी, जयदीप अहलावत हे कलाकार उपस्थित होते. सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page