आरोग्यगुन्हेगारीपिंपरी-चिंचवडपुणे शहरमहाराष्ट्र

बन मस्कामध्ये काचांचे तुकडे, पुण्यातील गुडलक कॅफेचा परवाना रद्द

पुणे : बन मस्क्यामध्ये काचेचे तुकडे आढळल्यामुळे एफ. सी. रोडवरील गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित केला आहे. तपासणीत आढळलेल्या त्रुटी दूर होईपर्यंत परवाना निलंबित राहणार आहे. कॅम्प परिसरातील हॉटेलमधील सूपमध्ये झुरळ आढळले आहे.

‘एफडीए’ने या हॉटेलची तपासणी केली असून, परवाना निलंबित करायचा की नाही, याचा निर्णय तपासणी अहवाल आल्यानंतर घेण्यात येणार आहे. अशी माहिती अन्न औषध प्रशासनाने दिली आहे.

शहरात दोन दिवसांत अन्नपदार्थात काचेचे तुकडे व झुरळ आढळल्याच्या धक्कादायक घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाला (एफडीए) जाग आली आहे. अन्नपदार्थ विक्रीच्या ठिकाणी अस्वच्छतेच्या तक्रारी आल्यास अथवा अनुचित प्रकार घडल्यानंतरच ‘एफडीए’ला कारवाईची उपरती सुचते.

तोंडदेखल्या तपासण्या अन् कारवाया करून वेळ मारून नेली जाते. यामुळे अन्न व औषध प्रशासनाला भेसळ रोखण्याच्या कर्तव्याचा विसर पडला आहे की यामागे आर्थिक लागेबंध आहेत? असा संतप्त सवाल उपस्थित करत नागरिकांनी ‘एफडीए’च्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

आकाश जलगी हे आपल्या पत्नीसह कॅफे गुडलकमध्ये गेले होते. त्यांनी चहा बन मस्काची ऑर्डर दिली होती. ऑर्डर आल्यावर ते चहा घेत असताना त्यांच्या लक्षात आलं की बन मस्का ज्या डिशमध्ये दिला होता त्यामध्ये काचांचे तुकडे त्यांना दिसले. सुरूवातील बर्फ वाटला होता पण त्यांनी पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं की बर्फाचे तुकडे नसून काचेचेच आहेत. यानंतर त्यांनी व्हिडीओ तयार केला. कर्मचाऱ्यांना जाब विचारला होता, त्यावेळी त्यांच्याकडी काही उत्तर नव्हतं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page