गुन्हेगारीछ. संभाजीनगरमराठवाडामहाराष्ट्र

समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर गोळीबार; , एक कर्मचारी जखमी 

छत्रपती संभाजीनगर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर असलेल्या एका टोल नाक्यावर एका कर्मचा-याने दुस-या कर्मचा-यावर गोळीबार केला. यात पोटात गोळी लागून कर्मचारी जखमी झाला आहे. छत्रपती संभाजीनगरपासून जवळच असलेल्या सावंगी येथे ही घटना घडली.

छत्रपती संभाजीनगरपासून जाणा-या समृद्धी महामार्गावर सावंगी येथे टोल नाका आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली.

रात्री टोल नाक्यावर दोन कर्मचा-यांचा वाद सुरू झाला. वाद विकोपाला गेला. त्यानंतर एका कर्मचा-याने थेट पिस्तूलच काढले आणि दुस-या कर्मचा-यावर गोळीबार केला.

गोळीबारात दुस-या कर्मचा-याच्या पोटात गोळी घुसली. तो रक्तबंबाळ झाला. त्याला तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव भारत घाटगे असे आहे.

माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेची माहिती घेतली. गोळीबार करणारा व्यक्ती फरार असून, त्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.

कर्मचा-याकडे पिस्तूल आले कोठून?

टोल नाक्यावरील कर्मचा-यांकडे कंपनीकडून पिस्तूल दिले जात नाही. मग या कर्मचा-याकडे पिस्तूल आले कोठून आणि कोणत्या उद्देशाने तो पिस्तूल जवळ बाळगत होता. यापूर्वी त्याने पिस्तुलाचा धाक दाखवून काही गुन्हे केले आहेत का? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page