गुन्हेगारीपुणे शहर

लाखो रुपयांच्या दुचाक्या चोरणारा आंतरराज्यीय अट्टल वाहनचोर विमानतळ पोलिसांकडून गजाआड

पुणे : २,५५,००० किंमतीच्या ५ दुचाकी चोरल्याच्या आरोपावरून योगेश संजय गालीकर ( वय २६ रा. गल्ली नं ७ विजयनगर चौधरी पार्क दत्तनगर दिघी पुणे, मूळगाव साकेगाव ता. भुसावळ जि. जळगाव) यास विमानतळ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पकडले. त्याच्यावर सुरत, गुजरात येथेही गुन्हे दाखल होते.

२५ जुलै रोजी कोंबिंग ऑपरेशनच्या अनुषंगाने विमानतळ पोलीस ठाण्याच्या परिसरात तपास पथक हददीत गस्त घालत होते. बर्माशेल लोहगाव परीसरामध्ये एका संशयित इसमास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चंदन व फौजदार रविंद्र ढावरे यांच्या पथकाने ताब्यात घेवून त्याचेकडे चौकशी केली.

त्याच्याकडील वाहनाबाबत चौकशी करता, होंडा शाईन ही गाडी सिग्नेचर हॉटेल, विमाननगर येथून चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले. अधिक तपास करता त्याने विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ४ दुचाकी व दिघी, पिंपरी चिंचवड येथे १ दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पूर्वाभिलेखाची पाहणी केली असता त्याच्यावर सुरत, गुजरात येथे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार,सह आयुक्त संदिप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ४) शशिकांत बोराटे, सहायक पोलीस आयुक्त संजय पाटील, यांच्या आदेशान्वये करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ पोलीस स्टेशन विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस पोलीस निरीक्षक विजय चंदन, पोलीस उप निरीक्षक रविंद्र चावरे, कर्मचारी अविनाश शेवाळे, अंकुश जोगदंडे, नाना कर्वे, दादासाहेब बर्डे, योगेश थोपटे, रुपेश पिसाळ, सचिन जाधव, सचिन कदम, ज्ञानेश्वर आवारी, सचिन जगदाळे यांचे पथकाने सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page