कोरेगाव पार्क येथे अवैधपणे हुक्का पार्लरवर छापा; ७ जण अटकेत

पुणे : कोरेगाव पार्क येथे अवैधपणे हुक्का पार्लर चालवल्याच्या आरोपावरून कॅफे होली हाॅटेलवर पोलिसांनी छापा टाकला. मुद्देमाल जप्त करुन मालकासह ७ जणांना अटक केली.
विजयसिंह गौते ( वय ४० वर्षे, रा. मॉर्डन केक शॉपच्या बाजुला, लेन नं.५. कोरेगाव पार्क) असे मालकाचे नाव आहे. संकेत संजीव रणपिसे (वय ३४ वर्षे, रा. घर नं.५२. शिनानंद हौसींग सोसायटी, वडगावशेरी) गोविंद कनाई दास( वय ३३ वर्षे) सुजित महादेव चौधरी (वय २१) सैम बापी डे, (वय.२२ वर्षे) प्रविण विश्वनाथ गायकवाड, (वय.२५) विपॉल्क बंसत सिंग, वय.२५ सर्व रा. गणपती मंदीराच्या मागे, लेन नं.१, कोरेगाव पार्क) सखाराम बबन देबे ( वय ३९ वर्षे, रा. सर्व्हे नं १०३, जय प्रकाशनगर, येरवडा) अशी कामगारांची नावे आहेत.
दि. १३ रोजी रात्री पावणेएक वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी अपरात्री सुरू असलेल्या कॅफे होली हाॅटेलवर छापा टाकला. धरपकड करत २१ काचेचे हुक्का पॉट, चिलीम सह, तसेच ३५ हुक्का पाईप, तंबाखुजन्य हुक्का फ्लेवर असलेले एकुण ८ प्लास्टिक डबे, कॉम्पुटर आदी ४० हजार रुपये किंमतीचे साहित्य जप्त केले.
कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन मध्ये १०३/२०२५ सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम २०१८ चे कलम ४-अ, २१-अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार मयुर सुर्यकांत शिंदे यांनी फिर्याद केली आहे. पोलीस उपनिरिक्षक श्रीकांत चव्हाण तपास करत आहेत.
शहरातील विविध भागात हुक्का पार्लर सुरुच
कायद्याने हुक्का पार्लर वर बंदी आहे. मात्र बाणेर, विमाननगर, कोरेगाव पार्क, कोंढवा, सिंहगड रोड आदी ठिकाणी हुक्का पार्लर सुरुच आहेत. पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी छुपेपणे ती चालवली जातात.



