दुर्घटनाग्रस्त इरशालवाडीत २२८ पैकी ७० नागरीक सुरक्षित उपमुख्यमंत्र्यांच्या निवेदनातील माहिती

मुंबई : मौजे चौक-मानिवली, तालुका खालापूर, जिल्हा रायगड या महसुली गावाच्या हद्दीतील इरशालवाडी या ठिकाणी२२८ पैकी ७० नागरीक स्वत: घटनेच्या वेळीच सुरक्षित असल्याचे प्राथमिक माहिती आहे. २१ जखमी असून त्यापैकी १७ लोकांना तात्पुरत्या बेस कॅम्पमधे उपचार केले असून ६ लोकांना पनवेल येथील MGM हॉस्पिटलमध्ये उपचार दिले जात आहेत. सकाळी १०.१५ पर्यंतच्या अहवालानुसार १० लोकांच्या मृत्यू झालेला आहे. उर्वरीत लोकांचा शोध व बचावकार्य सुरू आहे.
उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी केलेल्या निवेदनानुसार, त्याभागातील माती व दगड व तिव्र उतारावरून कोसळलेली दरडीचे स्वरूप पाहता व सतत पावसाच्या स्थितीमुळे चिखलपणा व ढिगारा घट्ट दबलेला असल्याने अतिशय दक्षतेने एनडीआरएफ च्या देखरेखीखाली स्थानीक ट्रेकचे तरूण एनडीआरफ जवान व सिडकोकडून पाठविलेले मजूर यांच्या मार्फत कार्यवाही सुरू आहे.
मौजे चौक-मानिवली महसुली गावाच्या हद्दीतील इरशालवाडी या ठिकाणी प्रामुख्याने ठाकर समाजाची ४८ कुटुंबे असून २२८ लोकसंख्या असलेली वाडी आहे.
वाडी ही उंच दुर्गम अशा डोंगरवर इरसाल गडाच्या पायथ्याशी वसलेली आहे. सदर ठिकाणी वाहने जाण्यासही रस्ता उपलब्ध नसून मौजे चौक मानिवली या गावातून पायी चालत जावे लागते. वाडीत ४८ कुटुंबे वास्तव्यास असून लोकसंख्या २२८ आहे. गेल्या ३ दिवसात (दि. १७ जुलै ते १९ जुलै) ४९९ मीमी पावसाची नोंद झाली आहे.
काल रात्री साडेदहा ते ११ या दरम्यान दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेची माहिती ११.३० दरम्यान जिल्हा प्रशासनास माहिती मिळाली. रात्री १२ वाजता राज्य नियंत्रण कक्षास माहिती मिळाली.
वस्ती तीव्र उतारावर असल्याने त्यामुळे दैनंदिन दळवळण प्रमुख रस्त्याने जोडलेले नाही. मुंबई पासून ८० किमी अंतरावर आहे. दूरध्वनी/मोबाईलने संपर्क साधणेही कठीण आहे. प्रामुख्याने ठाकर नावाचे आदिवासी समाज या वाडीत राहतो. इरशालवाडी हे ठिकाण भारतीय भुवैज्ञानीक सर्वेक्षण विभागाच्या अहवालानूसार संभाव्य दरड प्रवण ठिकाणाच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले नाही. यापूर्वी सदर ठिकाणी दरड कोसळणे, भुस्ख्लन होणे अशा प्रकरच्या घटना आलेल्या नाहीत.
घटनास्थळ अतिदुर्गम भागात असल्याने कोणत्याही वाहनाने घटनास्थळी पोहचणे अशक्य असल्याने डोंगर पायथ्याशी तात्पुरते नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आलेला आहे. व तेथील संपर्क क्र. 8108195554 आहे.
पनवेल येथील ट्रेकर्स ग्रुप यशवंती ट्रेकर्स व निसर्ग गुपचे नयमित ट्रेक करणारे व त्या परीसरातील भैागोलिक परीस्थिताचे अनुभव असणारे तरुण बचाव पथकात सहभागी झालेले आहेत. हवाईदलाची दोन हेलिकॉप्टर पहाटेपासून सांताक्रुझ हवाईतळावर बचावासाठी तयार आहेत तथापि खराब हवामानामुळे उड्डाण घेऊ शकत नाही. स्थानिक प्रशासनाने पायथ्याशी तात्पुरते हेलिपॅड तयार केले असून वातावरण अनुकूल होण्याची वाट पाहत आहेत.
स्थानिक पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व महसूल व पोलीस खात्याचे क्षेत्रिय अधिकारी घटनास्थळावर आहेत. जेसीबी सारखी यंत्रणा घटनास्थळी नेता येत नसल्याने त्वरीत बचावकार्य होण्याच्या दृष्टीने सिडको व स्थानिक यंत्रणेमार्फत अकुशल मजूर शोध व बचावासाठी आवश्यक साधनसामग्रीसह पाठविण्याची कार्यवाही सुरू आहे की जेणेकरून यंत्रसामग्री अभावी शोध कार्य सुरळीत सुरू ठेवून मलब्याखालील अडकलेल्या लोकांना कमीतकमी वेळेत सुखरूप बाहेर काढता येईल.



