गुन्हेगारीपिंपरी-चिंचवडपुणे शहरमहाराष्ट्रमुंबईराजकारणसामाजिक

अजित पवारांच्या नातलगाची बावधन पोलिसांकडून कसून चौकशी

खरेदी-विक्री घोटाळा प्रकरणात शीतल तेजवानी जेलमध्ये 

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने खरेदी केलेल्या कोरेगाव पार्क (मुंढवा) येथील ४० एकर जागेच्या खरेदी-विक्री घोटाळा प्रकरणात अखेर पार्थ यांचे भागीदार असलेले मामेभाऊ दिग्विजय पाटील बावधन पोलिसांसमोर हजर झाले. प्रकरणात तेजवानी हिला पुणे पोलिसांनी अटक केली. ती सध्या येरवडा तुरुंगात आहे.‌

पाटील यांची दिवसभर कसून चौकशी करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. अमेडिया एन्टरप्रायजेस एलएलपी कंपनीचे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यासह जमीन विक्रीबाबत कुलमुखत्यार पत्र असलेली महिला शीतल तेजवाणी आणि दस्त नोंदणी करणारे सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू या तिघांविरुद्ध बावधन पोलीस ठाण्यात ६ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शासनाच्या नियमांनुसार या जमिनीचा खरेदी-विक्री दस्त करताना पाच कोटी ८९ लाख ३१ हजार रुपये इतके मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक होते. मात्र, आरोपींनी संगनमत करून शासनाला देय असलेले मुद्रांक शुल्क न भरता फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

बावधन पोलिसांनी ७ डिसेंबर रोजी या प्रकरणातील आरोपी सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू याला भोर येथील राहत्या घरातून अटक केली. तारू सध्या पोलीस कोठडीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page