गुन्हेगारीनवी दिल्लीमहाराष्ट्रराष्ट्रीय

सीबीआयची संरक्षण मंत्रालयातील लेफ्टनंट कर्नलला लाचखोरीच्या प्रकरणात अटक 

नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मा आणि एक खाजगी व्यक्ती विनोद कुमार यांना लाचखोरीच्या प्रकरणात अटक केली आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागात आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि निर्यात कक्षाचे उप नियोजन अधिकारी लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मा आहेत. त्यांची पत्नी १६ इन्फंट्री डिव्हिजन, कमांडिंग ऑफिसर,कर्नल काजल बाली तसेच श्री गंगानगर, राजस्थान आणि दुबईस्थित एका कंपनीसह इतरांविरुद्ध फौजदारी कट आणि लाचखोरी इत्यादी आरोपांखाली दाखल करण्यात आले आहे.

शर्मा हे संरक्षण उत्पादनांचे उत्पादन, निर्यात इत्यादींचा व्यवसाय करणाऱ्या विविध खाजगी कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत फौजदारी कट रचून, त्यांना अवाजवी फायदे मिळवून देण्याच्या बदल्यात त्यांच्याकडून गैरवाजवी फायदा/लाच घेऊन, नियमितपणे भ्रष्ट आणि बेकायदेशीर कृत्यांमध्ये सामील असतात,असा आरोप आहे.

राजीव यादव आणि रवजीत सिंग हे आरोपी कंपनीचे भारतातील कामकाज पाहतात आणि ते बंगळूरु येथे वास्तव्यास आहेत. ते लेफ्टनंट शर्मा यांच्या नियमित संपर्कात होते आणि त्यांच्या संगनमताने, विविध सरकारी विभाग आणि मंत्रालयांकडून आपल्या कंपनीसाठी बेकायदेशीर मार्गांनी विविध गैरवाजवी फायदे मिळवण्याचा प्रयत्न करत होते. विनोद कुमार नावाच्या व्यक्तीने, सदर कंपनीच्या सांगण्यावरून, १८ डिसेंबर २०२५ रोजी शर्मा यांना ३ लाख रुपयांची लाच दिली.

श्री गंगानगर, बंगळूरु, जम्मू आणि इतर ठिकाणी शोधमोहीम राबवली जात आहे. दिल्लीतील शर्मा यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यात ३ लाख रुपयांची लाचेची रक्कम तसेच २,२३,००,००० रुपयांची रोख रक्कम आणि श्री गंगानगर येथील आरोपीच्या घरातून १०,००,००० रुपयांची रोख रक्कम, इतर आक्षेपार्ह साहित्यासह जप्त करण्यात आली आहे. नवी दिल्लीतील शर्मा यांच्या कार्यालयाच्या ठिकाणीही शोधमोहीम सुरू आहे. शर्मा आणि विनोद कुमार या दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page