छ. संभाजीनगरमराठवाडामहाराष्ट्रसामाजिकसोलापूर

तुळजापुरात शाकंभरी नवरात्र महोत्सवास सुरुवात 

धाराशिव : श्री तुळजाभवानी देवीच्या सात दिवस चालणा-या शाकंभरी नवरात्र महोत्सवास रविवारपासून सुरुवात झाली आहे.

या प्रसंगी तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, महंत तुकोजी बुवा, महंत चिलोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, उपाध्ये सुनीत (बंडू) पाठक, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे, अमराराजे कदम, अनंत कोंडो, लेखाधिकारी संतोष भेंकी, सहायक धार्मिक व्यवस्थापक अनुप ढमाले, रामेश्वर वाले यांच्यासह मंदिर संस्थानचे अधिकारी, कर्मचारी, पुजारी बांधव व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्रोच्चार, विधी आणि भक्तीभावाने संपूर्ण परिसर मंगलमय झाला होता.

श्री तुळजाभवानी देवींचे दरवर्षी दोन प्रमुख उत्सव साजरे केले जातात. त्यामध्ये अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र उत्सव व पौष महिन्यातील शाकंभरी नवरात्र उत्सवाचा समावेश आहे. शाकंभरी नवरात्र उत्सवाला तुळजापुरात ‘धाकटा दसरा’ असेही म्हटले जाते.

तत्पूर्वी गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेली श्री तुळजाभवानी देवींची मंचकी निद्रा संपवून सोमवारी पहाटे पौष शुक्ल अष्टमीच्या शुभमुहूर्तावर देवींची सिंहासनावर विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली.

सात दिवस चालणा-या या शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सांगता ३ जानेवारी रोजी शाकंभरी पौर्णिमेला दुपारी १२ वाजता पूर्णाहुती व त्यानंतर घटोत्थापनाने होणार आहे.

या नवरात्र काळात श्री तुळजाभवानी देवींची –२९ डिसेंबर रोजी रथ अलंकार महापूजा, ३० डिसेंबर रोजी मुरली अलंकार महापूजा, ३१ डिसेंबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा तसेच, सकाळी ७ वाजता जलयात्रा, १ जानेवारी रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा, व २ जानेवारी रोजी महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा संपन्न होणार आहे.

तसेच शाकंभरी नवरात्र काळात दररोज रात्री श्री तुळजाभवानी देवींचा छबीना (मिरवणूक) निघणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page