विनापरवाना दारु विकणाऱ्या हॉटेलवर छापा; तब्बल ७५,००० रुपयांची विदेशी दारु जप्त

पुणे : ओयासिस हॉटेल, न्यु एअरपोर्ट रोड विमाननगर येथे विमानतळ पोलीस स्टेशनचे तपास पथक प्रभारी पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड यांनी स्टाफसह अचानक छापा टाकला असता ७५,००० रुपयांचा विदेशी प्रोव्हीबिशन माल बेकायदेशिर विक्रीसाठी बाळगल्याचे दिसून आले.
प्रकाश गोपाळ पुजारी (वय ५० वर्ष रा. ईशा फुट प्रिंट, फ्लॅट नंबर १०३ वाकड ) आणि शंकरसिंग मोहनसिंग बोरा (वय ५२ वर्ष रा. हाऊसनंबर ६०७, म्हस्के वस्ती रावेत) यांच्यावर महाराष्ट्र प्रोव्हिबीशन कायदा कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी आगामी निवडणुकांच्या संदर्भात अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेशित केले होते. हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार थोपटे यांना मिळालेल्या बातमीनुसार ही कारवाई करण्यात आली.
सदरची कारवाई अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडल ७ सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, खराडी विभाग प्रांजली सोनवणे यांच्या आदेशान्वये करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद शेळके विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार योगेश थोपटे, रुपेश पिसाळ, राकेश चांदेकर, सचिन मांजरे, अंकुश जोगदंडे, लालु कन्हे, राहुल जोशी, अंबादास चव्हाण यांनी कारवाईत सहभाग घेतला.




