महाराष्ट्रमुंबईराजकारण

टीकेची झोड उठलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे शनि मंदिरात

नंदुरबार : विधानसभेत ऑनलाईन रमी खेळत असल्याचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर टीकेची झोड उठलेले कृषिमंत्री आणि नंदुरबारचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शनि मंदिरात जाऊन पूजा केली. आपल्या सर्वांच्या आयुष्यातली साडेसाती नष्ट होवो, असे साकडे घातल्याचे खुद्द माणिकरावांनी सांगितले. कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना त्यांनी मात्र याविषयी बोलण्यास नकार दिला.

साडेसातीमुक्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ येथील शनि मंदिरात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पूजा आणि आरती केली. या ठिकाणी अनेक नेते दर्शनाला येत असतात.

शनि महाराजांना विनंती केली, की आपल्या सर्वांवरील दुष्काळाचे निवारण होवो, आपल्या सर्वांच्या आयुष्यातील साडेसाती नष्ट होवो, आपल्या सगळ्यांना अत्यंत चांगले दिवस प्राप्त होवोत, अशी प्रार्थना केल्याचे माणिकराव नंदुरबार येथे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित कार्यक्रमासाठी उपस्थित असल्याचे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. मुंबईला गेल्यावर ऑनलाईन रमी वादावर सविस्तर बोलणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

शनिमहाराज कधीही सांगत नाहीत : रोहीत पवार 

रोहित पवारांनी त्यांच्या सोशल मिडीयावरती पोस्ट केली आहे. यावेळी रोहित पवारांनी माणिकराव कोकाटेंच्या शनिमंदिरात केलेल्या पुजेवरून सुनावलं आहे, रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, ”तुम्ही चुका करा मी तुमच्या पाठीशी आहे’, असं शनिमहाराज कधीही सांगत नाहीत, तरीही चुका करून अडचणीत सापडल्यानंतरच भल्याभल्यांना शिंगणापूरच्या शनिदेवाची आठवण येते…स्वार्थासाठी कोणत्याही मंत्र्याने शनिदेवाला कितीही तेलाचा अभिषेक केला तरी राज्यातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या कृषि विभागाला आणि मागासवर्गीय समाजाच्या समाजकल्याण विभागाला लागलेली पिडा आणि ती लावणारे या दोघांनाही दूर कर, अशी मी शनिमहाराजांना प्रार्थना करतो!’.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page