भारतीय वायूसेनेला मिळणार दोन तेजस मार्क-१ ए लढावू विमाने

नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेला सप्टेंबर महिन्यात २ तेजस मार्क-१ ए मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड भारतीय वायूसेनेला २ तेजस मार्क-१ ए लढावू विमाने देऊ शकते, असे भारताचे संरक्षण सचिव आर. के. सिंह यांनी सांगितले. या विमानांना वेपन्स इंटीग्रेशन म्हणजे शस्त्रास्त्रे जोडण्यात आली आहेत.
यावेळी आर. के. सिंह यांनी सांगितले की, सरकार हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लि. (एचएएल) बरोबर ९७ आणखी तेजस खरेदी करण्याचा करार करणार आहे. ज्याची अंदाजित किंमत ६७ हजार कोटी रुपये आहे. सध्या ३८ तेजस जेट फायटर विमाने वायूसेनेत सामील आहेत.केंद्र सरकारने १९ ऑगस्ट रोजी भारतीय वायूसेनेसाठी ९७ तेजस मार्क-१ ए फायटर जेट खरेदी करण्यासाठी ६७ हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. वास्तविक फेब्रुवारी २०२१ मध्ये सरकारने हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लि.सोबत ८३ तेजस मार्क-१ ए खरेदीसाठी ४८ हजार कोटींचा करार केलेला होता. परंतु हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लि.ने अमेरिकन इंजिन डीलिव्हरी होण्यास उशीर झाल्याने आतापर्यंत एकही विमान सोपवलेले नाही. परंतु आशा निर्माण झाली आहे की, २०२८ पर्यंत हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लि. सर्व विमाने वायूसेनेला सोपवणार आहे.
एलएसी मार्क-१ ए तेजस एअरक्राफ्टचे एडव्हान्स व्हर्जन आहे. या अपग्रेडेड एव्हियॉनिक्स आणि रडार सिस्टीम लावलेली आहे. एलएसी मार्क-१ एचे ६५ टक्के उपकरणे भारतात तयार झालेली आहेत. तेजसलादेखील हिंदुस्थान एअरोनॉटिक्सने विकसित केले आहे. हे सिंगल इंजिन असलेले हलके लढाऊ विमान आहे. एचएएलच्या जवळ ८३ एअरक्राफ्ट्सची डीलिव्हरी करण्यासाठी २०२८ पर्यंतचा वेळ आहे. हिंदुस्थान एअरोनॉटिक्सचे चेअरमन आणि मॅनेजमेंट संचालक डी. के. सुनील यांनी सांगितले की, डिलिव्हरीला झालेल्या उशिराबद्दल इंडस्ट्रीला जबाबदार धरले जात होते. परंतु या दिरंगाईला तांत्रिक त्रुटी जबाबदार आहे. यास आता दूर केले जात आहे.



