महाराष्ट्रराष्ट्रीयशैक्षणिकसामाजिक

अभिमानास्पद; जेष्ठ पत्रकार राजेंद्र वाघमारे यांना अमेरिकेतील संस्थेकडून डॉक्टरेट मानद पदवी प्रदान

पुणे : जेष्ठ पत्रकार राजेंद्र वाघमारे यांना अमेरिकेतील न्युयार्क येथील युनायटेड नेशन मान्यताप्राप्त ह्युमन राईटस प्रोटेक्शन कमिशन तर्फे पत्रकारिता या क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल डॉक्टरेट ही मानद पदवी प्रदान करून नुकतेच गौरविण्यात आले. गेली ३३ वर्षापासून राजू वाघमारे हे पत्रकारिता या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पत्रकारितेची सुरुवात लोकपत्र या दैनिकातून केली. तसेच त्यांनी लोकमत वृत्तपत्रात हैदराबाद प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. प्रसिद्ध तेलगु दैनिक इनाडू या वृत्तसमूहात बराच काळ काम केलेले आहे. सन २००४ पासून ते नेदरलँड्सच्या ग्लोबल ह्युमन राईटस डिफेन्सचे दक्षिण आशियाई देशाचे मध्यम सल्लागार आहेत. त्यांना देश-विदेशातून अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. मागील वर्षी लंडन येथील प्रतिष्टेचा समजला जाणारा “ग्लोबल इन्स्पिरेशनल अवॉर्ड्स २०२२” हा पुरस्कार लंडन पार्लेमेंट येथे प्रदान करून सन्मानित केले होते. अमेरिकेतील न्युयार्क येथील युनायटेड नेशन मान्यताप्राप्त ह्युमन राईटस प्रोटेक्शन कमिशन तर्फे डॉक्टरेट ही मानद पदवी प्राप्त झाल्याने विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page