उत्तमनगर मध्ये वेश्या व्यवसायावर छापा; मालकिणीस अटक, दोघींची सुटका

पुणे : गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने सिंहगड रस्ता परिसरातील उत्तमनगर मध्ये वेश्या व्यवसायावर छापा टाकून २ पीडित महिलांची सुटका करत महिला आरोपीस अटक केली.
गौरी विकास पवळे (वय ४५ वर्षे, रा. फ्लॅट नं ५०५, पाचवा मजला, बधे कॉम्पलेक्स, उत्तमनगर) असे आरोपीचे नाव आहे.
अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षास मिळालेल्या गोपनीय माहितीवरून उत्तमनगर मध्ये सरस्वतीनगर, योगिराज कॉम्पलेक्स येथे फ्लॅट नं १०१ मध्ये छापा घालण्यात आला. मुलींना वेश्या व्यवसायासाठी आणून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात होता. अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पडताळणी करुन बनावट ग्राहकाच्या सहाय्याने खात्री करण्यात आली.
अचानक छापा टाकून महिला आरोपीस ताब्यात घेऊन २ पीडित महिलांची सुटका करण्यात आली. उत्तमनगर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम १४३ (३), अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ कलम ३, ४, ५, ७, प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त, (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक छगन कापसे, पोलीस उप-निरीक्षक विशांत चव्हाण, पोलीस अंमलदार तुषार भिवरकर, दत्ताराम जाधव बबनराव केदार, अमेय रसाळ, पोलीस अंमलदार वैशाली इंगळे, खेडेकर यांनी सहभाग घेतला.
‘वसुली दादा’ चा आशीर्वाद?
दरम्यान, उत्तम नगर भागामध्ये अजूनही ग्रामीण परिसर मोठ्या प्रमाणामध्ये आहे अस्तित्व या भागांमध्ये तुरळक आहे. याचा फायदा घेऊन काही अवैध धंदे राजवट सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून अनैतिक वेश्या व्यवसाय सुरू आहे. तसेच अनेक हॉटेल्स मध्ये विनापरवाना देशी विदेशी दारूचे धंदे, खडकवासला भागामध्ये गांज्याचे धंदे खुलेआम फोफावले आहे. पोलीस ठाण्यातर्फे अवैध धंदे वाल्यांकडून दरमहा हप्ता गोळा करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या ‘वसुली दादा’च्या आशीर्वादामुळे धंदे बिनधोक सुरू आहेत, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.



