रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार; बिश्नोई टोळीने स्वीकारली फायरिंगची जबाबदारी, अकोला कनेक्शन समोर

अकोला : दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेणारी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. लॉरेन्स बिश्नोई टोळीतील शुभम लोणकर या सदस्याने या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारलीये. शुभम लोणकर आरजू बिश्नोई तो त्याच्या पोस्टमध्ये लिहित, मुंबईतील दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेतली.
याआधी राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची आणि आता रोहीत शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारणारा शुभम लोणकर. शुभम लोणकर हा मूळ अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील नेव्होरी गावाचा रहिवासी आहेय. या आधीही शुभम लोणकर याच्यावर अकोला पोलिसांनी कारवाई करत तब्बल ३ पिस्टलसह काही जिवंत काडतूस त्याच्याकडून जप्त केल्या होत्या. लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात असणा-या शुभम लोणकरला बंदुकीच्या तस्करी प्रकरणात अकोला पोलिसांनी गजाआड केले होते. शुभम हा बंदूक तस्करीचा मुख्य सूत्रधार होताये.
अकोट पोलिसांनी त्याच्याकडून बंदूक खरेदी करणा-या तिघांना बेड्या ठोकल्या होत्या. ‘तो’ गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील वार्जे शहरात रहायचा, त्यानंतर तो फरार होता. त्यावेळी शुभमला पुण्यातून अटक झाली होती त्यानंतर त्याची जमिनावर सुटका झाली होती.
शुभम लोणकर आणि लॉरेन्स बिश्नोई या दोघांच्या संभाषणाचं कॉल रेकॉर्डिंग पोलिसांकडे आहे. शुभम आणि बिश्नोई यांच्या संभाषणाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा समोर आले होते. शुभमचे नेटवर्क दुबई आणि इतर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांपर्यंत पसरले आहेये. त्यांचं अकोल्यातील नेव्होरी गांवात घर असून त्याच्या घराला अनेक दिवसांपासून कुलूप लागलं आहे.
पुण्यातून संशयित तरुणांना अटक
पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये तरुण वयोगटातील तरुणांचा समावेश आहे. अमान मोरोटे (२७), आदित्य गायकी (१९), सिद्धार्थ येनपुरे (२०), समर्थ पोमाजी (१८) आणि स्वप्नील सकट (२३) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत.



