पुणे शहर

सिंहगड रस्ता उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी 

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सिंहगड रस्ता उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले होते. नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये म्हणून उद्घाटनाचा कार्यक्रम सकाळी सात वाजता घेणारे ते अजित दादाच होते. त्यांचेच नाव या उड्डाण पुलाला देऊन आठवण जपली जावी अशी मागणी पत्रकार जागृती कुलकर्णी यांनी पवार यांच्या श्रध्दांजली सभेत केली.

जागृती कुलकर्णी म्हणाल्या ”राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने राज्याचे अपरिमित नुकसान झाले आहे. खऱ्या अर्थाने कामाचा माणूस, दूरदृष्टी असणारा नेता, सर्व क्षेत्रातील जाण असणारे व्यक्तिमत्व. ज्यांच्या निधनानंतर राज्यातील प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते ओक्साबोक्सी रडणारे सर्व पक्षातील नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि अगदी नागरिक सुद्धा होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण राज्य थांबले होते. असे वाटते. त्यांच्या कामाचा आवाका, आदर्श राज्यातील प्रत्येक पक्षातील प्रत्येक नेत्यांनी घ्यावा. ज्यामुळे राज्य खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होईल. हीच त्यांच्या कार्याला आदरांजली असेल. ”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page