पुणे शहर

हडपसर मध्ये ‘व्हाईट पर्ल स्पा’ वर छापा टाकून ३ महिलांची सुटका

पुणे : अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्षाने हडपसर भागात पुणे सोलापूर रोडवरील “व्हाईट पर्ल स्पा” मध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा टाकून ३ महिलांची सुटका केली. एक पुरुष आरोपीस गजाआड करण्यात आले. गजाआड करण्यात आलेला पुरुष हा “व्हाईट पर्ल स्पा” सेंटरचा मॅनेजर आहे.

सौरभ शामराव इंगळे ( वय २८ वर्षे, रा. लक्ष्मीमाता मंदीर, काळेपडळ, हडपसर) असे त्या मॅनेजरचे नाव आहे. “व्हाईट पर्ल स्पा” दुसरा मजला, दशमेश कॉम्पलेक्स, प्रणाम हॉटेल, शेजारी हडपसर गाडीतळ येथे मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू होता. मुलींना वेश्याव्यवसायासाठी आणून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करुन घेतला जात असल्याबाबत प्राप्त गोपनीय माहितीवरून पुणे शहर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्षा कडून ही कारवाई करण्यात आली.

सदर प्रकरणी आरोपीविरुध्द हडपसर पोलीस स्टेशन पुणे येथे गु.र.नं. १०५/२०२६ भा. न्या. सं. कलम १४३(१) (३),३ (५) अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

नमूद कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे ३) शंकर खटके, पोलीस निरीक्षक छगन कापसे यांच्या सुचनेनुसार करण्यात आली. गुन्हे शाखा पोलीस उप निरीक्षक विशांत चव्हाण, पोलीस अंमलदार तुषार भिवरकर, दत्ताराम जाधव, बबनराव केदार, इम्रान नदाफ, रेश्मा कंक व किशोर भुजबळ यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page