रेकॉर्डवरील अट्टल वाहन चोराला साथीदारासह ठोकल्या बेड्या: गुन्हे शाखा, युनिट-६ ची धडाकेबाज कामगिरी

पुणे : हडपसर व आजुबाजूच्या परिसरात झालेल्या वाहन चोरीच्या प्रकरणात अट्टल वाहन चोराला साथीदारांसह अटक करण्यात आली. पवन तानाजी माने (वय २२ वर्षे, रा. डी. वाय. पाटील रोड, पार्क व्हिस्टा, लोहगाव) असे त्याचे नाव आहे. ७,००,००० किंमतीच्या ८ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
पवन तानाजी माने आणि प्रतिक शिवाजी अस्वरे (वय २० वर्ष रा. चिचगाव ता. माढा जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पाहिजे आरोपी अक्षय रमेश भंडारी तसेच अल्पवयीन आरोपीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अंमलदार अमित कांबळे व तानाजी देशमुख यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराने बातमी दिली की, बापुराव तुकाराम तुपे चौक, अमनोरा पार्क सोसायटीचे मागे, हडपसर या ठिकाणी दोन मुले हिरो डिलक्स मोटर सायकलसह थांबलेली आहेत. त्यांच्याकडे असलेल्या मोटर सायकलला नंबरप्लेट नसून ती चोरीची आहे.
पोलिसांनी दोघांना पकडून सखोल तपास करता त्या तिघांनी व अक्षय भंडारी याने मिळून आणखी मोटर सायकल चोरी केल्याचे कबुली देऊन चोरी केलेली मोटार सायकल काढून दिल्या.
आरोपींकडून उघडकीस आलेले गुन्हे-
१ ) हडपसर पो.स्टे. गु.र.नं. ८२/२०२६ मा.न्या. संहिता. कलम ३०३ (२)
२) हडपसर पो.स्टे. गु.र.नं. १०/२०२६ भा.न्या. संहिता. कलम ३०३ (२)
३) हडपसर पो.स्टे. गु.र.नं. २७८/२०२५ भा. न्या. संहिता. कलम ३०३ (२)
४) दिघी पो.स्टे. गु.र.नं. ३३६/२०२५ भा.न्या. संहिता. कलम ३०३ (२)
५) हडपसर पो.स्टे. गु.र.नं. ११०१/२०२५ भा.न्या. संहिता. कलम ३०३ (२) ६) चंदन नगर पो.स्टे. गु.र.नं.४९३/२०२५ भा. न्या. संहिता कलम ३०३(२)
७) हडपसर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रामधील इतर एक मोटर सायकल
८) हडपसर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रामधील इतर एक मोटार सायकल
ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त, गुन्हे, निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस उप-निरीक्षक अभिजीत पवार, पोलीस अंमलदार प्रमोद टिळेकर, तानाजी देशमुख, प्रशांत कर्णवर, बाळासाहेब सकटे, अमित कांबळे, गणेश माने, शेखर काटे व मनिषा लोखंडे यांनी सहभाग घेतला.



