पुणे शहर

विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या आरोपातून मुख्याध्यापकाची सुटका

पुणे : येरवडा स्थित शाळेतील इयत्ता ९ वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीचा शाळेच्या मुख्याध्यापकाने विनयभंग केल्याच्या आरोपातून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.

या संदर्भात येरवडा पोलीस स्टेशन येथे भा.द.वि. कलम ५०९, ३५४ तसेच पोस्को ॲक्ट कलम ११ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुख्याध्यापक पदाच्या शर्यतीत असलेल्या एका शिक्षकाने पीडित विद्यार्थिनी व तिच्या पालकांना खोटी फिर्याद दाखल करण्यासाठी फूस लावली तसेच आरोपीने थकित शालेय फी भरण्यासाठी तगादा लावल्याने पीडितेचे पालक व संबंधित शिक्षकाने संगनमत करून उच्चशिक्षित मुख्याध्यापकास खोट्या केस मध्ये गुंतविले, असा युक्तिवाद आरोपीचे वकील ॲड. किरण कदम यांनी केला.

तो ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली. ॲड. कदम यांना ॲड. जगदीश सोनवणे, ॲड. निखिल खांदवे यांनी सहाय्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page