महाराष्ट्र

कराडच्या नीलम शिंदेंचे अमेरिकेत निधन

१ वर्ष २७ दिवस दिलेली मृत्यूशी झुंज अपयशी

कराड: उच्च शिक्षणासाठी अमेरिकेमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील साताऱ्याच्या कराड तालुक्यात राहणाऱ्या नीलम तानाजी शिंदे या तरुणीची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या नीलम यांचा कॅलिफोर्नियामध्ये रस्त्यावरून चालत असताना १४ फेब्रुवारी २०२५ रोजी सायकांळी ७ वाजता अपघात झाला होता. यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. मागील १ वर्ष २७ दिवसांपासून नीलम या कोमात होत्या. अखेरीस त्यांची प्राणज्योत मालवली.

दुर्दैवी बाब म्हणजे आखाती देशातील युद्धामुळे साताऱ्यातून नीलम यांचे वडील तानाजी शिंदे यांना आपल्या लेकीच्या अंत्यसंस्काराला जाता आले नाही. त्यामुळे आपल्या लेकीला ते अखेरचा निरोपही देऊ शकले नाही.

जवळपास १३ महिने नीलम यांच्यावर युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. अपघातात झालेल्या गंभीर दुखापतींमुळे अखेर त्यांच्या शरीराने साथ दिली नाही आणि २८ मार्च २०२६ रोजी उपचार सुरू असतानाच त्यांचे दु:खद निधन झाले.

शिंदे कुटुंबीयांनी नीलम यांच्या अवयव दानाचा निर्णय घेतला असून त्यानुसार नीलम यांचे डोळे आणि त्वचा (स्कीन) दान करण्यात आली, ज्यामुळे इतरांना नवजीवन मिळणार आहे. नीलम शिंदे यांच्यावर आज (७ एप्रिल) रोजी दुपारी १ वाजता अमेरिकन वेळेनुसार माऊंट व्हेरोन मेमरेबल पार्कमध्ये येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page