गुन्हेगारीपुणे शहर

प्राचार्याला खोट्या गुन्ह्याची भिती; बंडगार्डन पोलीस ठाण्यातील पोलिसांनी उकळले ७ लाख

पोलीस उपनिरीक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : एका नामंकित शैक्षणिक संस्थेच्या प्राचार्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देवून ७ लाख रूपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस अधिकारी आणि दोन अंमलदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस अंमलदार सुदाम तायडे व महिला पोलीस अंमलदार सोनाली हिंगे यांच्यावर बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल  करण्यात आला आहे

जुलै २०२५ मध्ये एका विद्यार्थीनीने तिची मुळ कागदपत्रे परत मिळवण्यासाठी पोलीसांकडे धाव घेतली होती. नियमानुसार प्रक्रिया सुरू असताना, संबंधित तपास अधिकाऱ्यांनी प्राचार्यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे खोटे आरोप केले. विद्यार्थीनी अल्पवयीन असल्याचे सांगून प्राचार्यावर ‘पोक्सो’अंतर्गत कारवाई करण्याची आणि संस्थेची प्रतिमा मलीन करण्याची भिती दाखविली. संस्थेची बदनामी आणि अटक टाळण्यासाठी संबंधितांनी १० लाख रुपयांची मागणी केली. अखेर तडजोडी अंती ७ लाख रुपये देण्याचे ठरले.

२८ जुलै २०२५ रोजी ही रक्कम कॉलेजमधील एका कर्मचाऱ्यामार्फत आरोपींपर्यंत पोहोचविण्यात आली. घडलेल्या चुकीच्या प्रकाराबाबत  पीडित मुलीने आपल्या पालकांसोबत पोलीस आयुक्तालयात तक्रार केली. पीडित मुलीने केलेल्या तक्रारीच्या चौकशीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी तरुणीला घाबरवून व संगनमत करुन हा बनाव रचला असल्याचे व खोटया गुन्ह्याचा धाक दाखवून जाणीवपूर्वक ही खंडणी वसूल केल्याचे समोर आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त, अमितेश कुमार,  पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त  पंकज देशमुख, पोलीस उपआयुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक १ पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख, आश्विनी जगताप, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट २ व पोलीस अंमलदार गणेश ढगे, साधना पवार, महेश पाटील, अमित गद्रे, शंकर नेवसे, यांनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page