गुन्हेगारीपुणे शहर

भोंदूचा पीडितेवर बलात्कार आणि ५० लाखांची फसवणूकही

पुणे : कौटुंबिक वादात तोडगा काढण्याचे आमिष दाखवून एका भोंदूने दैवी शक्तीचा संचार असल्याची बतावणी करत महिलेवर बलात्कार केला. त्याने महिलेची ५० लाख रुपयांची फसवणूकही केली.
आरोपी पंढरपूर परिसरातील तरटगावचा रहिवासी आहे. ४२ वर्षीय महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित महिलेचे पतीशी पटत नव्हते. त्यांच्यात कौटुंबिक वाद झाल्याने ती वेगळी राहत होती. महिलेची पाच वर्षांपूर्वी एकामार्फत
आरोपीशी ओळख झाली. तेव्हा आरोपीने देवऋषी असल्याची बतावणी महिलेकडे केली. माझ्या अंगात दैवीशक्तीचा संचार आहे, अशी बतावणी त्याने केली. कौटुंबिक समस्या दूर करतो, असे सांगून त्याने महिलेला जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याने महिलेला स्वारगेट परिसरातील एका लॉजवर बोलावून तिच्यावर बलात्कार केला.
त्यानंतर त्याने महिलेला माणगाव परिसरात बोलावून तेथील एका लॉजवर बलात्कार केला. महिलेला नोकरी, तसेच बांधकाम व्यवसायात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून आरोपीने तिच्याकडून वेळोवेळी ५० लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केली. काही रक्कम रोख स्वरूपात घेतली. महिलेकडून दागिने घेतले. गेले पाच ते सहा वर्षे हा प्रकार सुरू होता. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page