नवी दिल्ली

दिल्ली विधानसभा बॉम्बने उडविण्याची धमकी

अर्थसंकल्पापूर्वी खळबळ

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा आणि अध्यक्ष विजेंदर गुप्ता यांना पुन्हा एकदा बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे, ज्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान खळबळ उडाली आहे.

दिल्ली विधानसभा आणि तिचे अध्यक्ष विजेंदर गुप्ता यांना एका ईमेलद्वारे धमकी मिळाली आहे. या ईमेलमध्ये विधानसभा परिसरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभेजवळ असलेल्या विधानसभा मेट्रो स्टेशनलाही असाच धमकीचा ईमेल आला आहे. हे धमकीचे ईमेल सोमवारी सकाळी पाठवण्यात आले. एक ईमेल सकाळी ७ वाजून ४९ मिनिटांनी अध्यक्षांच्या अकाउंटवर, तर दुसरा सकाळी ७ वाजून २८ मिनिटांनी विधानसभेच्या अधिकृत ईमेल आयडीवर आला.

या ईमेलमध्ये नायब राज्यपाल तरणजीत संधू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि कॅबिनेट मंत्री मनजिंदर सिंग सिरसा यांच्या नावांचा उल्लेख आहे.

या धमकीनंतर दिल्ली पोलीस, बॉम्ब निकामी करणारे पथक, श्वान पथक आणि अग्निशमन दलाची पथके विधानसभेच्या परिसरात तैनात करण्यात आली. विधानसभेच्या संपूर्ण परिसराची कसून तपासणी करण्यात आली. तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page