पुणे शहर

दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे ४०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्र

कानाची तपासणी करून श्रवणयंत्र वाटप

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आणि अ‍ॅलिम्को कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने सदाशिव पेठेतील फडके हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील तब्बल ४०० ज्येष्ठांना श्रवणयंत्र मोल्ड चे वाटप करण्यात आले. महाराष्ट्राच्या विविध शहरांतून तसेच ग्रामीण भागातून हे ज्येष्ठ नागरिक शिबीरासाठी पुण्यात आले होते.

यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सुनील रासने म्हणाले, दगडूशेठ गणपती ट्रस्ट व विविध संस्था, कंपन्या यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबीरांचे आयोजन करण्यात येत आहे. केवळ पुण्यातच नाही, तर इतरही शहरातून या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. यावरुनच समाजातील मोठी व्यथा समोर येत असल्याचे दिसून आले आहे. आजच्या कार्यक्रमात ४०० रुग्णांना यंत्र देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page