मराठवाडा

खनिज माफियांना साथ दिल्याने वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी निलंबित

वसमत : वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी यांना नऊ दोषारोप ठेवत निलंबित करण्यात आले आहे. अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीविरुद्धच्या कर्तव्यात केलेला निष्काळजीपणा त्यांना भोवला.अवैध वाळू उपसा आणि गौण खनिज माफियांच्या विरोधात कडक पावले न उचलणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी हा एक इशारा मानला जात आहे.

महसूल व वन विभागाचे अवर सचिव प्रविण पाटील यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. दळवी यांच्याविरुद्ध अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीसंदर्भात प्रशासनाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. सर्वसामान्यांतूनही अनेकवेळा नाराजीही पुढे आली होती.

दळवी यांच्यावर नऊ दोषारोप ठेवण्यात आले असून यामध्ये १८ ऑगस्ट २०२३ रोजी जप्त करण्यात आलेले वाहन कारवाई न करताच सोडून देणे, वसमत तालुक्यातील नाहद मध्ये अवैध गौण खनिज काढणारे वाहन कारवाई न करता सोडणे, अनेक ठिकाणी अवैध रेती साठे असताना कारवाई न करणे, परळी दशरथे, माळवटा तसेच हिरडगाव व वसमत शहरातील अवैध गौण खनिजातील वाहने सोडून देणे असे आरोप निश्चित करण्यात आले आहे.

निलंबन कालावधीत जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्वसंमतीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही तसेच निलंबन काळात त्यांना कोणताही खाजगी व्यापार, व्यवसाय किंवा नोकरी करता येणार नाही, असे आदेशात नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page