
पुणे: नांदोशी येथे लताआशा रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची घोषणा पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांनी केली.१६ एप्रिल २६ रोजी मुख्यमंत्री फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांच्या उपस्थितीत नवीन हॉस्पिटलच्या भुमीपुजनाचा कार्यक्रम होणार आहे.
पुण्याजवळील नांदोशी इथे होणाऱ्या या नवीन हॉस्पिटलचे लताआशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस असे नाव असणार आहे.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन चालविते. तोच ट्रस्ट हे ही रुग्णालय उभारणार असल्याचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.



