गुन्हेगारीपुणे शहर

वाघोलीत दोघांकडून ३७ ग्रॅम ३ मिलीग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) पावडर जप्त

ड्रग्ज मुक्त पुणे शहरासाठी पोलीस सज्ज

पुणे : ड्रग्ज मुक्त पुणे शहरासाठी पुणे पोलिसांनी आता जोर लावला असून वाघोलीत आशियाना लॉज जवळ, सातव वस्ती रोड, मोकळया जागेत संशयास्पद हालचाली करणाऱ्या कार चालकास आणि नंतर त्याच्या साथीदारास पकडून ३७ ग्रॅम ३ मिलीग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) पावडर, एक मोबाईल, दोन कार असा ३१,०६,००० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वाघोली पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

१) योगेश सुभाष कणगरे (वय ३८ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. रूम नं. ३. शिवकृपा बिल्डींग, लेन नंबर ३. साई नगर, लोहगाव, मुळगाव मु.पो. माळी घोगरगाव ता. वैजापूर, जि. संभाजीनगर) २) सोनू सिंह ऊर्फ मनुवेंद्र ऊर्फ सोनू शंकर सिंह (वय ४२ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. फ्लॅट नं.१, यशश्री शगुन, सर्वेनंबर ३४/१. विदयानगर, गुड विल रेसिडेन्सी, लेन नंबर १३, टिंगरेनगर) अशी आरोपींची नावे आहेत. यांच्याकडून मिळणाऱ्या माहितीवरुन शहरात अंमली पदार्थांच्या विक्रीत असलेले मोठे जाळे समोर येईल असा पोलिसांचा अंदाज आहे.

कणगरे याच्याकडून १,०८,००० किंमतीचा मॅफेड्रॉन (एम.डी.) पावडर वजन ५ ग्रॅम ४ मिलीग्रॅम, ३,००,००० लाखांची चारचाकी गाडी असा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करून एन.डी.पी.एस. ऍक्ट कलम ८ (क). २१ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सोनू सिंह याचे घर व कार झडती केली असता  पार्किंग मधील वापरती कारमध्ये २३ ग्रॅम २ मिलीग्रॅम वजनाचे, ४,६४,००० किंमतीचे मॅफेड्रॉन (एम.डी.) आणि २०,००,००० किंमतीची कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हवालदार प्रदिप मोटे, शिपाई विशाल गायकवाड यांना कणगरे कारसह दिसल्याने त्यांना हटकले असता तो घाईगडबडीत जावू लागल्याने त्याचेवर अधिक संशय आल्याने ताब्यात घेण्यात आले.

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पुणे शहरामध्ये अंमली पदार्थांचे अवैध विक्रीवर आळा घालण्याकरता अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटण करण्याबाबत आदेशीत केले होते . त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांचे सुचनाप्रमाणे पोलीस निरीक्षक (गुन्हे), तपास पथक अधिकारी असे गुन्हे प्रतिबंध, अवैध धंदयावर कारवाई करणेकामी पेट्रोलींग करित असताना त्यास ताब्यात घेवून नाव पत्ता विचारला असता त्याचे नाव योगेश सुभाष कणगरे असे सांगितले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल हे करित आहेत.

सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त परीमंडळ ७ सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त लोणीकंद विभाग नुतन पवार  यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन नंदकुमार गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पल्लवी मेहेर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक अहिरे, तपास पथक अधिकारी मनोज बागल, पोलीस उपनिरीक्षक राहूल कोळपे, पोलीस अंमलदार बाबासाहेब मोराळे, प्रदिप मोटे , मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे, गहिनाथ बोयणे, अमोल ढोणे यांनी सहभाग घेतला.

दरम्यान,  पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या ड्रग्ज मुक्त पुणे शहर अभियानांतर्गत गुन्हे शाखा आणि त्या त्या परिमंडळ हद्दीतील पोलीस ठाण्यांनी सज्जता ठेवली आहे. गांजा, एमडी सारख्या अंमली पदार्थांवर सातत्याने कारवाई सुरू आहे. खबऱ्यांकडून मिळणाऱ्या माहितीवरुन किंवा अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार वाघोली पोलिसांकडून अड्ड्यांवर छापे टाकले जात आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page