पुणे शहर

भाजप कार्यकर्ता रमेश रेड्डी यांचा गोळ्या झाडून खून 

पुणे: भाजप कार्यकर्ता रमेश रेड्डी यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. पिंपरी-चिंचवडमधील देहूरोड परिसरात बुधवारी रात्री ही दुर्घटना घडली. गेल्या वर्षी त्यांचे बंधू विक्रम गुरुस्वामी रेड्डी यांचाही वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या गोळीबारात मृत्यू झाला होता.

रात्री ९ वाजण्याच्या सुमारास सवाना चौकात उभ्या असलेल्या रमेश रेड्डीवर हल्लेखोरांनी अचानक गोळीबार केला. तब्बल १६ राऊंड फायर करण्यात आले. एक गोळी त्यांच्या डोक्यात लागली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, रमेश रेड्डी यांचा काही वादग्रस्त व्यवहारांशी संबंध असल्याची माहिती पुढे येत आहे. या हत्येचा संबंध गेल्या वर्षी झालेल्या त्यांच्या भावाच्या हत्येशी असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे.

त्या प्रकरणातील आरोपी अद्याप कोठडीत असून त्यांना जामीन मिळालेला नाही. मात्र त्या घटनेतील तडजोडीवरून काही मतभेद निर्माण झाले होते का, याचाही तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page