पुणे शहर

पथविक्रेत्यांचा छळ थांबवा ; लोकजनशक्ती पार्टीची मागणी

पुणे : लोक जनशक्ती पार्टी (रामविलास ) महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत पथविक्रेत्यांवर होत असलेल्या अन्यायकारक कारवाईविरोधात तसेच पथविक्रेत्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी पालिका आयुक्त ,महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते निलेश निकम यांना महत्त्वपूर्ण निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनावर लोकजनशक्ती पार्टी (रामविलास ) च्या अनुसूचित जाती ,अनुसूचित जमाती आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संजय आल्हाट, संपर्क प्रमुख महाराष्ट्र प्रदेश प्रमोद राजगुरु, पुणे शहर अध्यक्ष जोस्ना मोरे, पुणे शहर उपाध्यक्ष राजश्री घोरपडे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियमन) अधिनियम २०१४ आणि संबंधित महाराष्ट्र नियम २०१६ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाईमुळे अनेक पथविक्रेते उपजीविकेपासून वंचित राहत असून त्यांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनात शहर विक्रेता समितीचे स्वतंत्र कार्यालय सुरू करणे, पथविक्रेत्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविणे, कारवाईपूर्वी किमान तीन वेळा नोटीस देणे, तसेच पुणे महानगरपालिका हद्दीत नव्याने ठिकाणे निश्चित करणे अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय पथविक्रेत्यांवर आकारण्यात आलेले शुल्क व दंड माफ करावा, नगर पथविक्रेता समितीमार्फत सर्वेक्षणाचा सविस्तर अहवाल सादर करावा आणि संबंधित अधिकाऱ्यांना कायद्याचे प्रशिक्षण देण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.

तसेच या विषयात पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त करत पथविक्रेत्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page