पुणे शहर

२८ लाखांची लाच घेताना आर्थिक गुन्हे शाखेतील महिला पोलीस अधिकारी सापळ्यात 

पुणे: महिला सहायक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार यांना खासगी व्यक्ती मार्फत बंडगार्डन रोडवरील हॉटेल जवळ २८ लाख घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत त्यांची नियुक्ती होती. त्यांच्याकडे ८ ते ९ तक्रार अर्ज तपासासाठी देण्यात आले होते. त्यांचा तपास सुरु असतानाच पोलीस निरीक्षक म्हणून बढतीवर मुंबई लोहगाव पोलीस येथे बदली करण्यात आली होती.

बढतीवर बदली झाल्याने त्यांना पुणे शहर पोलीस दलातून शुक्रवारी कार्यमुक्त करण्यात आले. नव्या पदावर रुजू होण्यापूर्वी या महिलेवर सापळा रचण्यात आला.

एका तक्रार अर्जाच्या चौकशीमध्ये २८ लाखांची लाच मागितली होती. त्यात एका खासगी व्यक्ती मार्फत तक्रारदारास बंडगार्डन रोडवरील हॉटेल कॉन्नाड येथे बोलवले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून २८ लाख रुपये घेण्यासाठी आलेल्या खासगी व्यक्तीला पकडले. पाठोपाठ वैशाली तोटेवार यांना ताब्यात घेतले. पाठापोठ दुसर्‍या दोन पथकांनी पोलीस आयुक्तालयातील त्यांच्या कार्यालयातील रुमची तर आणखी एका पथकाने त्यांच्या घराची झडती घेण्यास सुरुवात केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page