पुणे शहर

१६५ वाहनचालकांवर मद्यपान करून वाहन चालविल्याबद्दल कारवाई 

पुणे: मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध ३ दिवस विशेष मोहीम व समुपदेशन कार्यक्रम पुणे शहर वाहतूक विभागाकडून राबविण्यात आली. एकूण १६५ वाहनचालकांवर मद्यपान करून वाहन चालविल्याबद्दल कायदेशीर कारवाई करण्यात आली.

मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या चालकांविरुद्ध १ ते ३ मे दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली. शहरातील विविध भागांमध्ये एकूण ३० नाकाबंदी पॉईंट उभारून

ब्रेथ अनालायझरद्वारे तपासणी करण्यात आली.

संबंधित चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली तसेच पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली. समुपदेशन व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

पोलीस उपायुक्त कार्यालय, वाहतूक शाखा, येरवडा येथे समुपदेशन कार्यक्रमासाठी एकूण ६२ मद्यपी वाहन चालक उपस्थित होते.

पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सादरीकरणाद्वारे उपस्थितांचे मार्गदर्शन करण्यात आले.

अपघात प्रतिबंध, रस्ते सुरक्षितता वाढविणे

, नागरिकांचे प्राण व मालमत्ता संरक्षण, शिस्तबद्ध व जबाबदार वाहन संस्कृती निर्माण करणे हा मोहिमेचा हेतू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page