पुणे शहर

एका चौकात दोन ट्रॅफिक वॉर्डन,१ पोलीस, तरीही बेशिस्त वाहनचालकांना ऊत

पुणे: सायंकाळी भर वर्दळीच्या वेळी गजबजलेल्या चौकांमध्ये वाहतूक पोलीस आणि ट्रॅफिक वॉर्डन निवांतपणे मोबाईल मध्ये टाईमपास करताना दिसून येतात. त्यांच्या समोर बेशिस्त वाहनचालक बिनधास्त ये जा करत असल्याचे दिसून येते.

टिळक रस्त्यावरील गोपाळ गायन समाज कडे जाणाऱ्या चौकामध्ये चारही बाजूने येणारे वाहन चालक नेहमी वाहतूक नियमांचा भंग करत असतात. त्यामध्ये सिग्नल जंप करणे, भरगाव वेगाने वाहने दामटणे , रॉंग साईडने वाहन चालवणे, फुटपाथ वर दुचाकी किंवा चार चाकी वाहने उभी करणे आदींचा समावेश आहे.

डोळ्यांसमोर बेशिस्त वाहनचालक जात असताना त्या चौकामध्ये असलेले ट्रॅफिक वॉर्डन एकमेकांशी गप्पा मारत बसलेले असताना दिसून येतात. चौकात सिग्नलवर लाल दिवा लागलेला असताना आपल्या डोळ्यांसमोर सिग्नल जंप करून कोणी जात असले तरी ते हटकत नाहीत. त्यामध्ये वाहतूक पोलिसांचाही समावेश आहे. त्यामुळे एका चौकात वाहतूक नियमासाठी तीन तीन कर्मचारी असूनही वाहन चालकांना कसलाही धाक राहिला नसल्याचे दिसून येते. वाहतूक कोंडी होत असताना सुद्धा संबंधित जागी बसून राहत असल्याचे सांगितले जाते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page